सोलापूर – मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं प्रकरणाचा तपास आधी एनआयएकडे गेला. यादरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझेच आरोपी झाले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात विरोधकांनी सरकारला चांगलेच खिंडीत पकडले असून राज्य सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.
दरम्यान,मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे एकमेकांशी निगडित होतं, त्यामुळे मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा एनआयएकडे जाणं जवळपास निश्चितच होतं. मात्र आज अधिकृतरित्या हा तपास देखील त्यांच्याकडे गेला आहे.
ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.या सर्व प्रकरणात राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणात वंचित बहुजन विकास आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे.
‘मुंबईमधील मायकल रोडवर एक स्फोटकांनी गाडी सापडली. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रोज नवनवीन माहिती मिळत आहे. या प्रकरणात 22 तारखेला आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका मांडणार आहोत’, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
- ‘मास्क का नाही घातला’ असे विचारताच,पालिकेच्या कर्मचाऱ्याला महिलेने केली मारहाण
- जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, चहास्टॉल सोमवारपासून 31 मार्चपर्यंत बंद
- महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, काँग्रेसने किती रोजगार दिले : निलेश राणे
- शिवरायांचा एकेरी उल्लेख : प्रश्नपत्रिकेवरून वाद निर्माण झाल्यानंतर शिष्यवृत्ती कमिटीचा खुलासा


