Share

‘मास्क का नाही घातला’ असे विचारताच,पालिकेच्या कर्मचाऱ्याला महिलेने केली मारहाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढली आहे. यादरम्यान सरकारने कोविड-१९ चे नियम कडक केले आहेत. मास्क घालणे आणि सोशल डिस्टनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र याकडे लोक गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र दिसत आहे.

अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. एका महिलेने मास्क न घातल्या बाबत विचारणा केली असता तसेच कारवाई करण्याचे म्हणताच हि महिला आक्रमक झाली. आणि तिने थेट मुंबई पालिका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आज पालिका कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. एका महिलेला मास्क का घातला नाही, असे विचारताच ही महिला चिडली आणि बीएमसीच्या महिला कर्मचार्‍यावर लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेने केवळ मारहाण केली नाही तर पालिका कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूकही दिली आणि शिवीगाळ केली आहे.

हि सगळी घटना त्याठिकाणी उपस्थितीत असलेल्या एका व्यक्तीने शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!