कोल्हापूर- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावे चालणाऱ्या कागल येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी प्रश्नपत्रिकेत देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुत्वाची शिकवण संपूर्ण देशाला देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी पद्धतीने करून देशातील तमाम जनतेच्या मनातील महापुरुषांचा अवमान केला आहे असा आरोप भाजपने केला आहे.
हे केवळ संतापजनक नसून निषेधार्थ सुद्धा आहे, त्यामुळे हसन मुश्रीफांनी ही प्रश्नपत्रिका तात्काळ मागे घेऊन संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी करत, 24 तासांच्या आत ही प्रश्नपत्रिका मागे न घेतल्यास या विरोधात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.दरम्यान, या सर्व प्रकारामुळे मुश्रीफ यांच्यावर टीका होऊ लागली आहे यानंतर आता मुश्रीफ यांच्या फेसबुक पेजवरून कागल तालुका शिष्यवृत्ती नियोजन कमिटी कागलची बाजू मांडणारी एक पोस्ट केली असून या घटनेबाबत खुलासा केला आहे.
नेमकी काय आहे पोस्ट?
गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षीप्रमाणेच या परीक्षेसाठी यावर्षीही नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन, कागल यांच्यावतीने अर्थसहाय्य करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम हे कागल तालुकास्तरावर तज्ञ शिक्षकांची शिष्यवृत्ती नियोजन समिती करीत असते. समितीच्या या अथक परिश्रमामुळेच कागल तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या शैक्षणिक ऊठावासह नेहमीच आघाडीवर राहिला आहे. या प्रश्नपत्रिकांच्या निर्मितीमध्ये फाउंडेशनचा दूरान्वयेही संबंध नसतो. दोन वर्षांपूर्वी परीक्षांच्या दिवशीच ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. त्यादिवशी परीक्षा घ्याव्यात की नकोत, असा संभ्रम आमच्या मनात होता. परंतु; त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफसाहेब म्हणाले, माझ्या आईचे निधन झाल्याचे दुःख आहेच. परंतु; शिष्यवृत्ती परीक्षा हा शैक्षणिक उपक्रम आहे, त्या परीक्षा रद्द करू नका, त्या घ्याच. उलट, परीक्षा घेतल्यामुळे माझ्या आईच्या आत्म्याला आनंद मिळेल, असे प्रोत्साहनही त्यांनी आम्हाला दिले होते.
दरम्यान, ही प्रश्नपत्रिका गणित विषयाची होती. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे ऐतिहासिक दाखले अगर संदर्भ दिलेले नाहीत. ज्याप्रमाणे क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वधर्मीयांची नावे वापरली जातात. त्याच धर्तीवर प्रश्नपत्रिकेमध्ये विविध नावांचा वापर केलेला आहे. यामध्ये कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि नाही. गणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वापरलेल्या या नावाला कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी अगर संदर्भ नाही.समाज माध्यमांमधून या प्रश्नपत्रिकेवर निर्माण झालेल्या आक्षेपांबद्दल कागल तालुका शिष्यवृत्ती कमिटी खुलासा करीत आहोत. – कागल तालुका शिष्यवृत्ती नियोजन कमिटी कागल
प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या संभाजी तोडकर यांनी दिलगिरी व्यक्त केली…
दरम्यान, ही प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षक संभाजी तोडकर रा. राधानगरी यांनी असा खुलासा केला आहे की, त्यानी गणित विषयाची प्रश्नपत्रिका क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या धर्तीवरच तयार केली आहे. उदाहरणादाखल दिलेली नावे ही माझे व माझ्या भावाची आहेत. या सगळ्यामुळे ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीदसाहेब मुश्रीफ याना विनाकारण मनस्ताप सोसावा लागला.दरम्यान, तरीसुद्धा दुखावलेल्या भावनांमुळे मी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत आहे.– संभाजी तोडकर रा. राधानगरी
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

