🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.
पुढे बोलताना आंबेडकर यांनी ‘सरकारमध्ये संवेदनशीलता अजिबात राहिलेली नाही. सरकारने अजिबात मदतीकडे लक्ष दिलं नाही. कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार मोडून पडलेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक रकमी पैसे खर्च करण्याचे आदेश द्यावेत’ अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
तसेच वेधशाळेच्या अंदाजावर सरकारला गांभीर्य नाही. वेधशाळेच्या अंदाजावर विश्वास ठेवून निर्णय घेतला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला लक्ष केले आहे. दरम्यान काल प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, साज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पूराचं राजकारण नको, सर्वांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत करा : मुख्यमंत्री
- पूरग्रस्तांना दिलासा, सांगलीत पुराचे पाणी ओसरायला सुरुवात
- #महापूर : सगळे मणी एकाचं माळेचे, भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचीही जाहिरातबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
