Share

#महापूर : सगळे मणी एकाचं माळेचे, भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचीही जाहिरातबाजी 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून प्रशासनाने मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. मात्र ही मदत करताना भाजप सरकारने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरातबाजीवरून फडणवीस सरकार सकाळपासून चांगलेच टोले खात आहे. तर हे टोले मारण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आघाडी मारली होती. मात्र आता स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीची गत झाली आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाने देखील पूरग्रस्त भागात मदत म्हणून देणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटावर नेत्यांचे फोटो टाकले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यांनी फेसबुकवर टाकलेल्या फोटोमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या बॉक्सवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावलेले असल्याचे  दिसत आहे. त्यामुळे भाजप असो की राष्ट्रवादी सगळे एकाच माळेचे मणी अशी टीका सोशल मिडीयावर होत आहे. भाजपच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. मात्र आता स्वतः देखील जाहिरातबाजी करत असल्याचं उघड झाल आहे.

दरम्यान  कोल्हापूर – सांगलीतील पूरस्थिती अजूनही कायम आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरूचं आहे. अनेक नागरिक अजूनही पाण्यात अडकले आहेत. अशा विदारक परिस्थितीत जनतेच्या आणि ढेपाळलेल्या प्रशासनाच्या मदतीला सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. तर लष्करी पथकं देखील पूरग्रस्तांची मदत करत आहेत. या महापूरामुळे आपत्ती व्यवस्थापन खात्याचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.   त्यात आता मुजोर राज्यकर्त्यांनी दुर्दैवी परिस्थितीचं राजकीय भांडवल केले आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!