Share

पूरग्रस्तांना दिलासा, सांगलीत पुराचे पाणी ओसरायला सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. परंतु आता पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

सांगली शहरातील पुराचे पाणी आता ओसरायला सुरु झाले आहे. परंतु पाणी ओसरण्याचा वेग अत्यंत संथ आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागणार असला तरी पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हळूहळू जन जीवन पूर्ववत होणार आहे. तरी अजूनही शहराचा जवळपास ६५ टक्के भाग पाण्याखाली गेलेला असून कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी सुमारे ५६ फुटांपर्यंत पोहोचली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत गेल्या १२ तासांत १ फुटाने घट झाली आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ५६ फुट आहे. तसेच कृष्णा नदीची धोक्याची पातळी ४५ फूट आहे. त्यामुळे अद्याप जवळपास १५ फुटांनी पाण्याची पातळी कमी होणे आवश्यक आहे. त्यानंतर जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात होईल. अद्यापही शहरातल्या बऱ्याच भागांमध्ये घरे आणि दुकानांमध्ये पाणी भरलेले आहे.

दरम्यान, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत करणार आहेत. या भेटीत त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हेही असणार आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!