🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा मानला जाणारा प्रकल्प वेदांता फाॅक्सकाॅन गुजरातला गेला. यावरुन आतापर्यंत विरोधातील सर्व नेत्यांनी हल्लाबोल केला. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात ट्विट वाॅर देखील पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर वेदांता कंपनी कडून देखील ट्विट केले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील टीका केली आहे.
जयंत पाटील कडाडलेः
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने महाराष्ट्रात होणारी मोठी गुंतवणूक गेली असून आता त्याबदल्यात हे देतो ते देतो म्हणून महाराष्ट्राला गाजर दाखवण्यात येत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मात्र दुसऱ्या प्रकल्पांना मर्यादा आहेत, मागील वीस दिवसांमध्ये असं काय झालं की, प्रकल्प गुजरातला गेला, असं पहिल्यांदाच घडत आहे, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
राज्यात ज्या लोकांनी प्रकल्प आणला होता तेही आता ट्विट करून माहिती देत आहेत, म्हणजे त्यांना जे बोलायला सांगितले आहे तसंच ट्विट त्यांनी केलं जात असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच गुजरातमधील तरुणांना सांगण्यासाठीच हा प्रकल्प तिकडे नेला असावा अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. मात्र आता हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांना सहकार्य करू असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
सर्व पक्षांनी एकत्र यावे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावीः
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील सहकार्याची भूमिका दाखवली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी असं एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ पिठाची भाकरी खा…
- Eknath Khadse | राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा – एकनाथ खडसे
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! भोसरी भुखंड घोटाळा प्रकरणी अँन्टी करप्शन कोर्टात होणार सुनावणी
- Ajit Pawar | “कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप… झोप…!” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना टोमणे
- Sanjay Gaikwad । बाळासाहेबांची परंपरा तर आम्ही जोपासत आहोत, त्यामुळे मेळावा घेणारच; संजय गायकवाड आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
