टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात अॅंड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषेद ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी वंचितने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे असे ते म्हणाले.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले,वचिंत बहुजन आघाडी आपली भूमिका कॉंग्रेस समोर मांडणार आहे.राष्ट्रवादी कधीही भाजप सबोत जाऊ शकते. त्यामुळं राष्ट्रवादीसोबत युती शक्य नाही असेही ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषेदेत म्हणाले.
दरम्यान ते म्हणाले, दुसरीकडं विरोधी पक्ष नसल्यामुळं शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. त्यामुळं विरोधी पक्षाला जनतेने सत्तेत येऊ दयावे असे यावेळी ते म्हणाले. तर एमआयएम सोबत आमचे मैत्रीचे नाते असून आमची युती होणार असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

