अकोला : – काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत.या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वातील एनडीएसाठी प्रतिष्ठेची बनली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल १२ प्रचारसभा घेतल्या. परंतु बिहारी मतदार यावेळी मोदींच्या कोणत्याही आश्वासने आणि घोषणांना भुलले नसल्याचेच एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे.
२४३ जागांची ही विधानसभा आहे. यामधील १२२ जागा मिळाल्या तर बहुमत मिळेल आणि हे बहुमत मिळवणे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला शक्य आहे अशी शक्यता आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला १२० च्या वर जागा दाखवल्या आहेत.
दरम्यान, बिहार निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘आमच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सने विकासाला केंद्रबिंदू मानून प्रचारात वास्तव मुद्द्यांवर भर दिला. आमच्यामुळेच बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली, असं सांगताना बिहारमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. बिहार विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल’, असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे


