अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी खात्याला दिले असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. राहुरी खुर्द येथे तनपुरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
ना. तनपुरे पुढे म्हणाले की, तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन त्याचे पंचनामे तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती नामदार तनपुरे यांनी दिली.
ग्रामविकास, महसूल, कृषी विभागाने समन्वयाने आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पीक नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशा सूचना ना.तनपुरे यांनी केल्या आहे. यावेळी पिरताजी चोपडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाढे, बाळासाहेब हराळ, गोविंद अण्णा मोकाटे, माजी सरपंच इमाम शेख, राज्याच्या राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, माजी सरपंच मच्छिंद्र पवार, मुळा प्रवराचे माजी संचालक पठाण साहेब, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस, गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठा युवक प्रचंड अस्वस्थ ; राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकला-पूजा मोरे
- कर्जहप्ते वसुलीला स्थगिती आणि चक्रवाढ व्याज यावर सर्वोच्च न्यायालयातही तोडगा नाहीच!
- ‘ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का?’ भाजप आमदाराच्या वक्तव्यावर साधला निशाणा
- ‘दानवे किती रस्त्यावर असतात हे सर्वांना माहित आहे’ ; बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
- ‘आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

