मुंबई : मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे, असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी यांनी केलं आहे. “आपल्या तरुणी मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत,”असंही त्यांनी म्हटलं होत.
यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या आमदाराच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपवर निशाणा साधला आहे. मुलींवर होणारा अन्याय देश सहन करु शकत नाही. सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. समाज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर येत असताना भाजपची भूमिका संशयास्पद आहे. भाजपचे आमदार केवळ संस्कृतीच्या गप्पा मारतात. हाथरसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का? ज्या मुलांनी तिच्यावर अत्याचार केले, ते संस्कारित होते का, असे प्रश्न देखील बाळासाहेब थोरात यांनी भाजपला केले आहेत.
केशव उपाध्ये म्हणतात महाराष्ट्रातल्या अत्याचारांचं काय ?
महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचारांचं काय? युपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय ? असे प्रश्न भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.
हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाला अधिकार आहे. मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत, त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे.
महत्वाच्या बातम्या :-
- LGBT Cell ची स्थापना करत राष्ट्रवादीने घालून दिला इतर राजकीय पक्षांना आदर्श
- शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवणार? संजय राऊत म्हणतात…
- समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन
- #व्यक्तिविशेष – रिषभ पंत : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक झळकवणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज…
- ‘महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’ : केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

