🕒 1 min read
पंढरपूर : एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत असताना धनगर आरक्षांचा मुद्दा देखील आता तापू लागला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदान मोहीम सुरु केली आहे.’आजवर तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- चित्रा वाघ यांनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचे कॉंग्रेसने केले तोंडभरून कौतुक
- LGBT Cell ची स्थापना करत राष्ट्रवादीने घालून दिला इतर राजकीय पक्षांना आदर्श
- कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी
- ‘दानवे किती रस्त्यावर असतात हे सर्वांना माहित आहे’ ; बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
- प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
