बीड- मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे राज्यातील स्पर्धापरीक्षांची तयारी करणारा मराठा युवक प्रचंड अस्वस्थ आहे. आपल्याला नेमके कोणत्या प्रवर्गात समाविष्ट केले जाणार याबाबत कोणतीच स्पष्टता नाही त्यामुळे राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे.मोरे यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात त्या म्हणतात, राज्यसेवेच्या परीक्षा घेताना सरकारमराठा तरुणांना कोणत्या प्रवर्गात ग्राह्य धरणार आहेत याबाबत शासन कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिनांक 11ऑक्टोबर रोजी नियोजित केली आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमअवस्था आहे. ज्यावेळी परीक्षा अर्ज भरले गेले तेव्हा मराठा उमेदवारांनी ते एस.ई.बी.सी प्रवर्गातून भरले होते मात्र आरक्षणा स्थगिती मिळाल्यामुळे आपला प्रवर्ग नेमका कुठला ई.डब्लू.एस कि खुला याबाबत आयोग तसेच राज्यशासन कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाही. यावर राज्यसेवा आयोगाचे सहसचिव यांनी जोपर्यंत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत परीक्षेचा निकाल लावला जाणार नाही असे हास्यस्पद स्पष्टीकरण दिले आहे.
यावर जर इतर समाजातील उमेदवार जर निकाल लावण्याची मागणी घेउन न्यायालयात गेले तर राज्य लोकसेवा आयोगाला निकाल लावावाच लागेल असा मराठा उमेदवारांनचा आक्षेप आहे. त्यापेक्षा राज्यसरकारने एक महिन्यात आरक्षणावरील स्थगिती उठवावी व नंतर राज्य लोकसेवा आयोगाला परीक्षा घ्यायला निर्देश द्यावेत अशी मराठा उमेदवारांनची मागणी आहे.त्याबद्दल खासदार छत्रपती संभाजी महाराज,खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाची मागणी लावून धरली आहे.
एकंदरीत मराठा आरक्षण स्थगिती, राज्यातील कोरोना संसर्गची वाढती संख्या तसेच अवेळी पाऊस यामुळे झालेले शेतीचे नुकसान, अभ्यासिका बंद असणे यामुळे राज्यातील स्पर्धापरीक्षा करणारा युवकवर्ग प्रचंड बैचेन आहे त्यामुळे या परीक्षेचे आयोजन पुढे ढकला अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- चित्रा वाघ यांनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचे कॉंग्रेसने केले तोंडभरून कौतुक
- LGBT Cell ची स्थापना करत राष्ट्रवादीने घालून दिला इतर राजकीय पक्षांना आदर्श
- कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी
- ‘दानवे किती रस्त्यावर असतात हे सर्वांना माहित आहे’ ; बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
- ‘आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’


