Share

दानवेंनी माफी मागावी म्हणून प्रहारचं टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन!

Published On: 

औरंगाबाद : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.

दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देशातील शेतकऱ्यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन यांची फूस असल्याचा आरोप करुन शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेवून मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसने देखील केली आहे.

आता, दानवेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन अवलंबलं आहे. औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. गेल्या 24 तासापासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. त्यांनी दिलेल्या वेळेत माफी मागितली नाही तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु,’ असा आक्रमक इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, दानवेंचे जावई व कट्टर राजकीय विरोधक असलेले हर्षवर्धन जाधव यांनी देखील या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांचं समर्थन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!