Share

‘त्या’ खासदारांचा काय अभ्यास? भुजबळांचा उदयनराजेंना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ९ डिसेंबरला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच ही सुनावणी घेण्यात आली.  मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे मराठा समाजाच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला होता. विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात असून राज्य सरकारने गंभीररित्या याचा विचार करावा व न्यायालयात भक्कम भूमिका माणसाची अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आता पुढील सुनावणी जानेवारीच्या अखेरीस होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून राजकारण देखील पेटलं आहे. अनेक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपणाचा सामना रंगल्याचे गेल्या काही महिन्यात दिसून आले. आता, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत आहेत. आरक्षणच्या मुद्यावर बॅकस्टेज राजकारण करत आहेत. मराठा समजाचं नेतृत्व करणारे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही असे एक खासदार बोलतात त्यांचा काय अभ्यास? त्यामुळे शरद पवार यांच्या विषयी गैरसमज पसरविले जात असल्याची टिका करतानाच खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर देखील छगन भुजबळ यांनी निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!