🕒 1 min read
जयपूर : कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी केलेले बंड शमल्यानंतर राजस्थान सरकार स्थिर झाले असे वाटत असताना आता पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची चीन्हे दिसू लागली आहेत. पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर अशोक गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) ने काँग्रेस सरकारला दिलेले समर्थन मागे घेतले आहे. बीटीपीच्या दोन आमदारांनी गहलोत सरकारला समर्थन दिले होते.बीटीपीचे दोन आमदार राजकुमार रोत आणि रामप्रसाद यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि गुजरातचे आमदार महेश वसावा यांच्याकडे काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी केली होती. यावर हिरवा कंदील येताच त्यांनी पाठिंबा काढल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे तिकडे हरियाणामध्ये भाजपाचे सरकार संकटात आले आहे. मनोहरलाल खट्टर सरकारला दिलेलं समर्थन आता उपमुख्यमंत्री दुष्यंत काढून घेण्याच्या विचारात आहेत असे वृत्त माध्यमांमधून समोर येत आहे.दरम्यान,८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करा; काँग्रेसचा हल्लाबोल
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- महिलेला राज्यचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर कौतुकच – पंकजा मुंडे


