मुंबई : राजकीय मतभेदामुळे होणारी वादावादी अनेकदा जीवावर बेतल्याच्या घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून नेत्यांवर होणाऱ्या आक्षेपार्ह टीकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्ते परस्परांविरोधात गुन्हे दाखल करत असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच, आज सकाळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना बांद्रा सायबर सेल पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहीत पवार यांच्यावर ट्विटरवर टीका केल्याने भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा दावा भाजप कडून करण्यात आला आहे. प्रदीप गावडे यांना ताब्यात घेतल्याचं समजताच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 295 अ, 500 आणि 505/2 कलमांतर्गत तसेच आयटी एक्ट 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान, प्रदीप गावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण कोणतंच आक्षेपार्ह भाष्य वा पोस्ट केली नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपल्या ट्विटवर कायम असून मला सत्य बोलण्याचा अधिकार आहे, असं देखील गावडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय होणार ? केंद्र सरकारची महत्वाची बैठक
- ‘…तर १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो
- एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करणे योग्य नाही; चंद्रकांत पाटलांच विरोधकांना प्रत्युत्तर
- ‘एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, पण उद्धव ठाकरे मात्र कपड्याची इस्त्रीही मोडू न देता मुंबईत परतले’
- औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

