Share

धमाकेदार खेळाने सुरु केला सराव; बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ

Published On: 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa Cricket team) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने (India Cricket team)  तयारी सुरू केली आहे. जोहान्सबर्गमध्ये सराव सुरू करण्यापूर्वी विराट कोहली आणि संघाला कडक आयसोलेशनमधून जावे लागले.

दरम्यान, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू फूट वॉली खेळताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जोहान्सबर्गमधील पहिल्या सराव सत्रासाठी भारतीय संघ त्यांच्या बॅटरी कशा रिचार्ज करतो?

या व्हिडिओत क्रिकेटपटू खेळाचा आनंद लुटताना दिसले. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही या मजेदार उपक्रमात भाग घेतला. या सत्रात भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीही मस्तीच्या मूडमध्ये दिसला.

IND vs SA 2021-22 – टेस्ट सीरीज शेड्यूल

पहिला कसोटी सामना, 26-30 डिसेंबर 2021, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
दुसरा कसोटी सामना, ०३-०७ जानेवारी २०२२, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना, 11-15 जानेवारी 2022, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन

IND vs SA ODI 2022 – वनडे सीरीज शेड्यूल

पहिली एकदिवसीय – 19 जानेवारी 2022, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ल
दुसरा एकदिवसीय सामना – 21 जानेवारी 2022, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ल
तिसरा एकदिवसीय सामना – 23 जानेवारी 2022, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!