Share

विमानाची प्रवाशी संख्या कोरोनामुळे घटली, नांदेड विमानतळावर शुकशुकाट

Published On: 

नांदेड : मागच्या वर्षीपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या यंदा खुप वाढत असल्याने कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे याचा फटका आता विनानसेवेला होताना दिसत आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे विमानतळावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

श्री गुरु गोविंदसिंहजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता दिवसभरातून २० ते १५ प्रवाशी हे प्रवास करत असल्याची माहिती विमानतळाचे व्यवस्थापक गजेंद्र गुट्टे यांनी दिली आहे. कोरोना सुरु होण्याअगोदर नांदेड विमानतळावरुन खुप मोठया प्रमाणात विमानातून प्रवाश करणाऱ्यांची संख्या चांगली होती. परंतू आता मात्र कोरानाचा कहर वाढत असताना विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खुप संख्या घटली आहे.

कोराेनाच्या काळात दोन महिन्यात विमानतळ बंद होते. तर मागच्या वर्षी मे अखेरीस विमानसेवा सुरु झाली होती. तर तेव्हा देखील नियमीतपणे सुरु असणाऱ्या विनानाची गर्दी होताना दिसत नाही. तर विमानसेवा दर मंगळवार, गुरुवार, शनिवारी नांदेड – अमृतसर – दिल्ली तसेच टू जेट ची सेवा मंगळवार, बुधवार, गुरुवारी नांदेड – मुंबइ – नांदेड – हैदराबादकडे उड्डाण घेत असते. विमानामध्ये १६२ प्रवाशी क्षमता आहेय परंतू मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी १५० प्रवाशी प्रवास करत होते. या वेळी संचखंड गुरुव्दाऱ्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा खुप चांगला प्रतिसाद होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!