Share

४५ ते ५९ वयोगटातील ६० हजार नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

Published On: 

औरंगाबाद : शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने सर्व ११५ वॉर्डात कोरोना लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शासन निर्देशांन्वये ४५ वर्षांवरील सर्व प्रकारच्या नागरिकांना कोरोला लस दिली जात आहे. अवघ्या काही दिवसांतच ४५ ते ५९ वर्षांवरील सुमारे ६० हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरीकडे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकडून मात्र या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात करण्यात आली. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. गतवर्षी कोरोनावर ठोस औषध उपलब्ध नव्हते. पण आता लस उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला जाऊ शकतो, असे तज्ञांचे मत असल्याने टप्प्याटप्प्याने लसीकरणाची गती वाढविली जात आहे.

पालिकेने ५ एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सोबतच व्यापारी, बँक कर्मचारी, कामगारांना लसीकरण केले जात आहे. पालिकेसह शासकीय १२१ व खासगी २८ अशा १४९ लसीकरण केंद्रांतंर्गत ही मोहीम राबवली जात आहे. मागील पंधरा दिवसांत या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार बुधवारपर्यंत एप्रिलपर्यंत ४५ ते ५९ वर्षांवरील ५९,२२५ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ४९ हजार ७६१ ज्येष्ठांनीच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!