Share

शाळासिद्धि अंतर्गत, शाळांना स्वयंमूल्यमापनाच्या सूचना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे. तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासीत करण्यासाठी शैक्षणिक, संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरून शाळासिद्धी कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शाळा सिद्धी उपक्रमाअंतर्ग दरवर्षी राज्यातील शंभर टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येते. या शाळासिद्धी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्या www.shaalasiddhi.niepa.ac.in पोर्टलवर २०२०- २१ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४ हजार ३५१ शाळा आहेत. आत्तापर्यंत फक्त एक हजार ५०६ शाळांनी पोर्टलवर माहिती भरली असून २ हजार २५८ शाळांनी कामच सुरु केलेले नाही. ६८८ शाळांकडून सध्या माहिती भरणे सुरु आहे. शाळांनी २६ एप्रिलपर्यंत (ता.२६) शाळेचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून माहिती भरायची आहे.

माहिती भरण्याबाबत सर्व सूचना, गाईडलाईन वेबपोर्टल देण्यात आलेल्या आहेत. स्वयंमूल्यमापन करताना मुख्याध्यापकांनी शाळासिद्धीची स्वतंत्र संचिका करून त्यात युजरनेम आणि पासवर्ड स्वतःच्या ताब्यात ठेवावे. मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्या वेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकांकडे हस्तांतरित करावी. स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेल्या शाळांनी हार्ड कॉपी सदर संचिकेत लावावी. याबाबत अडचण आल्यास शाळासिद्धी संपर्क अधिकारी व तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, अशा सूचना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण (माध्य), डायट प्राचार्य डॉ. कलीमोद्दीन शेख यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!