Share

बाहुबलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच बाहुबली 3 येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

नवी दिल्ली : बाहुबली 3 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि प्रभास पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रभासने नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत तो पुन्हा एकदा एस एस राजामौलींसोबत काम करू शकतो असे वक्तव्य केले आहे. प्रभासच्या या वक्तव्यामुळे ‘बाहुबली 3’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

बाहुबलीमध्ये काम करत असताना प्रभासने अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. कारण त्याला तेव्हा फक्त राजामौलीच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करायचे होते. बाहुबली 3 साठी राजामौली आणि प्रभास यांच्या हातमिळवणीची सध्या केवळ चर्चा आहे. अधिकृत माहिती येईपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल कारण निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

एका मुलाखतीत प्रभासने सांगितले की तो बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबत पुन्हा हातमिळवणी करू शकतो. प्रभास म्हणाला की, राजामौली बाहुबलीची फ्रेंचायझी बंद करायला तयार नाहीत. बाहुबलीचा पुढचा भाग लवकरच येऊ शकतो, असे तो म्हणाला. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. येथे, दिग्दर्शक एसएस राजामौली त्यांच्या  चित्रपटात व्यस्त झाले आहेत, जो 25 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!