🕒 1 min read
पुणे : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. या पुणे दौऱ्यात मोदी शहरातील काही विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिका भवनातील छत्रपती शिवाजी महराजांच्या मूर्तीचे अनावरण देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा महत्वाचा ठरणार आहे.
मात्र नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. तसेच सामाजिक माध्यमांवर सुद्धा नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब. आंबेडकर पुतळ्याजवळ मोदी यांच्या पुणे दौऱ्या विरोधात आंदोलन केले आहे. तर काँग्रेसने शहरातील खंडूजी बाबा चौकात आंदोलन केले आहे.
पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने शहरात बऱ्याच ठिकाणी गो बॅक मोदी असा मजकूर असलेले काळे फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाच दुसरीकडे सामाजिक माध्यमांवर सुद्धा मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाल्यावर सामाजिक माध्यमांवर गो बॅक मोदी असा ट्रेंड चालवण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजे पर्यंत गो बॅक मोदी हा ट्रेंड चालवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi in Pune : पंतप्रधान मोदींकडून पुणे मेट्रोला ग्रीन सिग्नल
- “जे मोदींना जमलं ते तुम्हाला 50 वर्षाच्या…”; भाजपचे पवारांना प्रतिउत्तर
- IND VS SL : श्रीलंका संघ पहिल्या डावात १७४ धावांवर ऑलआउट, संघावर फॉलोऑनची नामुशकी
- Russia – Ukraine War: जो बायडेन आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात रशिया युद्धाबाबत महत्वाची चर्चा
- PM Modi in Pune : पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचं अनावरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
