Share

रवींद्र जडेजाचे शेन वॉर्नबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला त्याने मला…

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजाने दिवंगत ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची आठवण काढत त्याच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. जडेजा म्हणाली की, वॉर्नच आहे. ज्याने मला आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळण्यास मोठी संधी दिली.

जडेजा म्हणाला, “ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. मला या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. पहिल्यांदा मी त्यांना २००८ मध्ये भेटलो होतो. माझा विश्वासच बसत नव्हता की मी त्याच्या बरोबर खेळतोय. आम्ही नुकताच १९ वर्षाखालील विश्वचषक खेळून आलो होतो. त्यानंतर लगेच मला या दिग्गजा बरोबर खेळण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मला खूप मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. त्यांच्या निधनानंतर एक गोष्ट कळाली की आयुष्यात काहीही निश्चित नसते. कधी काहीही घडू शकते.”

ऑस्ट्रलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी वयाच्या ५२ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात जडेजा राजस्थान रॉयल्स संघचा भाग होता. तर वॉर्न कर्णधार, त्याने आपल्या नेतृत्वात राजस्थानला आयपीएलचे विजेते पद मिळवून दिले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!