Share

IND vs SA : आवेश खानने त्याच्या कामगिरीचे श्रेय ‘या’ कारणामुळे दिले राहुल द्रविडला; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. राजकोट येथे खेळलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपल्यानंतर दिनेश कार्तिकच सामनावीर ठरला, हे खरे असले तरी, सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खाननेही दमदार कामगिरी केली. काही चाहत्यांना असेही वाटत होते की या सामन्यातील कामगिरी पाहता आवेश खानला सामनावीर म्हणून पुरस्कार मिळेल. आवेशने ४ षटकांत केवळ ८ धावा देत चार बळी घेतले. सामन्यानंतर आवेशने सांगितले की, पहिल्या ३ सामन्यांमध्ये विकेट न मिळाल्याने त्याच्यावर दबाव जाणवत होता. परंतु द्रविडच्या आत्मविश्वासाने त्याला सामना जिंकण्याची कामगिरी करण्यास प्रेरित केले.

सामना संपल्यानंतर आवेश म्हणाला की, ‘गेल्या चार सामन्यांमध्ये संघात कोणताही बदल झालेला नाही. याचे श्रेय राहुल सरांना जाते. ते प्रत्येकाला संधी देतात आणि दीर्घ संधी देतात. एक-दोन खराब कामगिरीनंतर ते कोणालाही संघाबाहेर टाकत नाही कारण एक-दोन सामन्यांच्या आधारे खेळाडूला न्याय देता येत नाही. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याच्या भरपूर संधी मिळत आहेत.’

आवेश पुढे म्हणाला, ‘हो, माझ्यावर दबाव होता. मला तीन सामन्यांत मिळवता आला नाही. पण राहुल सर आणि संघ व्यवस्थापनाने मला आणखी एक संधी दिली. त्यामुळे चौथ्या सामन्यात मी चार बळी घेतले. या दिवशी माझ्या वडिलांचाही वाढदिवस होता. त्यामुळे माझ्याकडून त्यांना ही भेट होती.’ आवेशने असेही सांगितले की, सलामीवीर इशान किशनशी बोलल्यानंतर त्याने गोलंदाजीची रणनीती आखली.

हा वेगवान गोलंदाज म्हणाला की, ‘मी ईशानशी बोललो आणि तो म्हणाला की हार्ड लेन्थ चेंडू खेळायला अवघड जात आहे. काही चेंडू उसळी घेत आहेत तर काही कमी राहिले आहेत. मी स्टंपवर गोलंदाजी करण्याचे धोरण आखले आणि हार्ड लेन्थ चेंडू टाकले. माझे काम चांगली गोलंदाजी करणे आहे, विकेट मिळवणे माझ्या हातात नाही.’ टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळण्याच्या शक्यतेबाबत तो म्हणाला, ‘संघात निवड होणे माझ्या हातात नाही. मला प्रत्येक सामन्यात माझे १०० टक्के योगदान द्यायचे आहे. माझ्या कामगिरीत कमतरता राहिली याचा मला नंतर पश्चात्ताप करायचा नाही.’

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील t20 मालिकेचा निर्णायक पाचवा सामना बंगळुरु येथे खेळला जाणार आहे. बंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम हे आकाराने लहान असल्याने या मैदानावर भरपूर धावा होण्याची शक्यता आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तोच संघ मालिकेचा विजेता ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरताना दिसतील. मागील दोन सामने भारताने जिंकल्याने भारतीय संघात कोणतेही बदल पाहायला मिळणार नाहीत. मात्र दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!