Share

अधिकच्या खर्चामुळे परळीतील वीजनिर्मिती बंद

Published On: 

🕒 1 min read

बीड : परळीत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती आज मंगळवारपासून बंद करण्यात आलेली आहे. आर्थिक कारणाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. ६, ७, ८ हे प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे संच आहेत. या तिन्ही संचाची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॅट इतकी आहे. हे संच नेमके किती दिवस बंद राहणार आहेत, याबद्दल अस्पष्टता आहे.

आज सकाळी १२ च्या दरम्यान केंद्रातील संच क्रमांक ६ आणि संच क्रमांक ६ हे बंद करण्यात आले असून क्रमांक ८ हा देखील दुपारपर्यंत बंद केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने महाजनकोच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने चालु वीजनिर्मिती बंद केल्याचे सांगितले.

वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळसा या कच्च्या मालावरील खर्च वाढला आहे. वाढलेला उत्पादन खर्च कंपनीच्या आर्थिक धोरणांच्या निकषात बसत नाहीये. त्यामुळे वीज निर्मितीला प्राधान्य देण्याऐवजी कंपनीच्या मेरिट ऑर्डर डिसपॅच (एमओडी) मध्ये बसत नसल्याने वीज निर्मिती करणे परवडत नसल्याचे देण्यात आले आहे. यामुळे वीजनिर्मिती पूर्णत: ठप्प करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील लवकरच जाहिर करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!