Share

अलाहाबाद बँक ग्राहकांसाठी आले मोबाइल बँकिंग अॅप: जाणून घ्या

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये सरकार तसेच रिझर्व्ह बँकेकडून देखील बँक क्षेत्रामध्ये मोठे बदल केले जात आहेत तर नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थ संकल्प सादर केला यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. दोन बँकांचे खासगीकरण तसेच एलआयसीचे आयपीओ विक्री अशा निर्णयांचा समावेश आहे. त्यानंतर आता अगोदरच विलीकरण झालेल्या अलाहाबाद बँकेच्या इंडियन बँकेत तांत्रिक विलीनीकरण होणार आहे.

त्यामुळे ज्या ग्राहकांचे बँक खाते पूर्वीच्या अलाहाबाद बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तांत्रिक विलीनीकरणानंतर अलाहाबाद बँकेच्या शाखांचे आयएफएएस कोड बदलले जातील. 15 फेब्रुवारी 2021 पासून आपल्या शाखेचे जुने IFSC कोड कार्य करणार नाहीत. जर कोणी जुना कोड वापरला तर पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत. आपल्याला सांगू की 1 एप्रिल 2020 पासून अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे अलाहाबाद बँक खातेधारकांसाठी आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले. या नव्या नियमानुसार ग्राहकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड वापरणे बंधनकारक असणार आहे.

यासाठी खातेदारकांना ऑनलाईन बँकिंगसाठी indoASIS App डाऊनलोड करावा लागणार आहे. त्याप्रमाणे आईएफएससी कोड, मोबाइल बँकिंग अॅप, चेक बुक आणि पासबुक निमयांमधील बदलही आजपासून लागू करण्यात आले आहेत. तसेच आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT), आईएमपीएस (IMPS) सेवांसाठी ‘IDIB’ कडून सुरु होणारा नवा IFSC कोड होम ब्रांचमधून घेऊ शकतात किंवा www.indianbank.in/amalgamation या वेबसाईटवरुन लॉग इन करुनही घेऊ शकतात. ग्राहकांची गैरसोय होऊन नये यासाठी अलाहबाद बँक व्यवस्थापनाकडून ग्राहकांना वेळोवेळी सुचना दिल्या जात होत्या.

अलाहाबाद बँक नियमात जरी आजपासून बदल झाले असले तरी खातेदारकांचे चेकबुकला सहा महिन्यांची वैध्यता असणार आहे. चेकबुकप्रमाणे एटीएम देखील ग्राहक सहा महिने वापरु शकणार आहेत. ग्राहक अधिक माहितीसाठी कस्टमर केअर नंबर 1800-425-00000 वर कॉस करु शकतात. तसेच ऑनलाईन बँकिंगसाठी http://indianbank.net.in या संकेतस्थळाचा वापर करु शकता. यावेबसाईटमध्येच ग्राहकांना नव्या नियमांनुसार जुन्या बँकेसंदर्भातील कागदपत्रं कशी अपलोड करायची याची माहिती मिळेल. ग्राहकांना अडचणी येऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!