बीड : दिल्ली शेतकरी आंदोलन प्रकरणातील टूलकिटचे बीड कनेक्शन समोर आले आहे. ग्रेटा थनबर्ग टूलकिटप्रकरणी बंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक झाली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांकडून याच प्रकरणात बीड येथील शंतनू मुळक याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई मेल आयडी शंतनूचा असल्याचा दावा केला जात आहे. तेव्हापासून शंतनू मुळूक हे नाव देशभरात चर्चेत आले आहे.
शंतनू हा बीई मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याचे वडील शिवलाल मुळूक हे माजी नगराध्यक्ष आहेत. बीडच्या चाणक्यपुरी भागात तो राहतात. त्याने अमेरिकेतून एमएसची पदवी घेतली आहे. ते पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याचे त्याच्य कुटुंबीयाकडून सांगण्यात आले. शंतनू हा औरंगाबाद येथे नोकरी करत होता. पण नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच तो पुणे येथे गेला होता. दि. १२ फेब्रुवारी रोजी दिल्ली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सज्जनसिंग आणि त्यांच्या पथकाने बीडमध्ये येत शंतनूची चौकशी केली. दिल्ली पोलिसांचे अधिकारी आमची चौकशी करत असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे शंतनूच्या पालकांनी सांगितले आहे.
शंतनूबाबत त्याचे वडील शिवलाल मुळुक म्हणतात, ‘तो पर्यावरणासाठी काम करत होता. लॉकडॉऊनमध्ये आमच्यासोबतच होता. ७ फेब्रुवारीला आमच्या भावाच्या मुलाचे लग्न होते. त्यासाठी तो आला होता. तेव्हा त्याच्याशी शेवटची भेट झाली. आम्हालाही त्याची काळजी वाटते आहे. १२ तारखेला सकाळी दिल्ली पोलिसांची टीम आली होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांनी मला चौकशीसाठी औरंगाबादमध्येही नेले’ असे शंतनूचे वडील शिवलाल मुळुक यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान, टूलकिट गुन्ह्याप्रकरणी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटक टाळण्यासाठी मुळक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर आज मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- चेन्नईत टीम इंडियाने इंग्रजांना गाडलं; दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय
- पंढरपुरात श्री. विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेचा नयनरम्य विवाह सोहळा; पहा फोटो
- पवार साहेबांवर टीका करणाऱ्यांची वैचारिक पातळी घसरलीय – निलेश लंके
- मोहन भागवत यांच्या सोबत अभिनेते मिथुन चक्रवर्तीं यांची भेट कौटुंबिक की राजकीय ?
- सोप्या शब्दात जाणून घ्या टूलकिट म्हणजे नेमकं काय ?


