Share

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी: EPFO कडून व्याज दराच्या घोषणेची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: १ फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नोकरदारांच्या ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संदर्भात घोषणा केली आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंदर्भात 2021 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलीय. आधी सांगितल्याप्रमाणे पीएफमध्ये गुंतवणुकीसाठी 80 सी अंतर्गत कर कपातीचा फायदा, व्याज उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे आणि ही रक्कम पाच वर्षांनंतर पैसे काढल्यानंतर करमुक्तदेखील आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आर्थिक वर्षात ईपीएफमध्ये अडीच लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असेल.

त्यांनतर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची पुढील बैठक 4 मार्चला श्रीनगरमध्ये होणार आहे. यावेळी मार्च महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) कडून 2020-21 वर्षासाठी व्याज दराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. ईपीएफओकडून सीबीटी सदस्यांच्या बैठकीचा अजेंडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचं म्हटलंय.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खातेदारांना द्यायच्या व्याज दराबाबत चर्चा होऊ शकते. ईपीएफओचे जवळपास 6 कोटी ग्राहक आहेत. त्यांच्या खात्यामध्ये व्याज जमा केले जाते. 2019-20 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून 8.5 टक्के व्याज दर दिला होता. गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याज दर होता. 2018-19 मध्ये 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची पहिली बैठक 5 फेब्रुवारी 1953 मध्ये झाली होती. त्यानंतर श्रीनगरला बैठक झालेली नाही. सीबीटीच्या बैठका दिल्ली, शिमला, पटना, चेन्नई आणि मुंबईमध्ये झाल्या आहेत.

आपल्या यूएएन नंबरमध्ये केवायसी करण्यासाठी आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपली केवायसी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकता. यासाठी यूएएन पोर्टलवर जा आणि केवायसीच्या पर्यायावर क्लिक करा. समोर उघडलेल्या विंडोमध्ये पॅन, आधार, मोबाईल नंबर, बँक खाते असलेल्या विभागावर क्लिक करा. त्यात आपली माहिती भरा आणि सबमिट करा. आता आपले पॅन आणि आधार त्यात जोडले जातील. परंतु, ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला आपल्या एम्प्लॉयरला सूचित करावे लागेल. एम्प्लॉयर पडताळणी होताच आपण ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असाल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!