Share

स्टेजवर वर पुन्हा रंगणार डॉक्टर गुलाटी आणि चप्पूची जुगलबंदी

Published On: 

मुंबई : प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा शो काही दिवसांपूर्वीच बंद झाला आहे. शो अचानक बंद झाल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 31 जानेवारीला हा शो बंद झाल्यानं चाहत्यांची निराशा झालेली असतानाच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता जुलैमध्ये एका नव्या रुपात कपिल शर्मा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे या नव्या शोमध्ये कपिल आणि सुनिल ग्रोवरची  जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

द कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनमधून सुनिल ग्रोवरही शोमध्ये वापसी करणार आहे. याआधीही अनेकदा सुनिल ग्रोवर शोमध्ये वापसी करणार असल्याच्या बातम्या आल्या, मात्र ही वापसी झाली नाही. मात्र, यावेळी स्वतः बॉलिवूड भाईजान सलमान खाननं या वादात उडी घेत दोघांना पुन्हा एकत्र आणलं असल्याची माहिती समोर येत आहे.

कोईमोई डॉट कॉमनं दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खान कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर यांच्यातील वाद मिटवत आहे. सुनिलनं शोमध्ये वापसी करावी यासाठी सलमान सगळे प्रयत्न करत आहे. कारण, कपिल शर्मा शोचे निर्माता इतर कोणी नसून स्वतः सलमान खानच आहे. सुनिल ग्रोवरच्या शोमधील वापसीची बातमी सोशल मीडियावरुन हाती लागली आहे. नुकतंच कपिल शर्माच्या मेकअप आर्टिस्टनं सुनिल ग्रोवरसोबतचा आपला एक फोटो शेअर केला होता. आता जुलैमध्ये शोच्या वापसीनंतर सुनिल ग्रोवरच्या वापसीबद्दल शिक्कामोर्तब होऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!