बीड : आज माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रात लोकनेता म्हणून ओळख निर्माण केलेल्या या नेत्याला सर्व पक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, गोपीनाथरावांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत त्यांना अभिवादन केलं आहे.
‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंत्रालयातील कार्यालयात स्व. अप्पांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अप्पा, लोकसेवेचा वसा जपताना तुम्ही सदैव पाठीशी असल्याची जाणीव मला सतत प्रेरणा देत राहील,’ असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंनी दिला शब्द…
आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन. 2/2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 3, 2021
‘अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो. आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन,’ असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “आज मुंडे साहेब असते तर मराठा समाजावर हा अन्याय झाला नसता”- पंकजा मुंडे
- HSC : बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब !
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली
- ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’; किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवर मनसेची टीका
- दहावीच्या परीक्षा रद्दच ! उच्च न्यायालयातील ‘ती’ याचिका अखेर मागे

