लातूर: जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत बुधवारी अचानक वाढ झाली. नव्यानं १५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, बुधवारी ३५८५ जणांची चाचणी केली असता १५१ कोरोना बाधित आढळले आहेत, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती त्यामुळे लातूरकरांना काहीसा दिलासा मिळत होता, मात्र बुधवारी अचानक कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाल्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लातूर जिल्हा हळूहळू अनलॉक होत असताना बाजार पेठ खुली झाली. यामध्ये बुधवारी अचानक संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी ९५७ आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आले होते त्यामध्ये ७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. २६२८ रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये ७९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. लातूर जिल्ह्यात एकूण ३५८५ चाचणी पैकी १५१ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८९१६५ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६५२ आहे. लातूर जिल्ह्यात बुधवारी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात दिवसागणिक कमी होणारी रुग्ण संख्या अचानक वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे बुरशी जण्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसीसची भीती तर दुसरीकडे अनलॉक होत असताना रुग्ण संख्या वाढल्याने ही चिंतेची बाब आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे तसेच बाजार पेठत अक्षरशः नागरिकांची झुंबड उडाली. एकीकडे कोरोना रुग्णा संख्या कमी होत असताना अचानक संख्या वाढल्याने प्रशासनाने सर्तकेचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली
- पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच आहे – पाटील

