Share

‘शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात’

Published On: 

जालना : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. आज शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी होणारी बैठक शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली.

या कृषी विधेयकांवरून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. आता, भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनाविषयी अजब दावा केला आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आलं असून दानवे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवं वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवल असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. ते जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!