Share

‘शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेतेच आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घेत आहेत’

Published On: 

नवी दिल्ली:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या  शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या सहा बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

दरम्यान, आज माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्यासह खा. राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधी पक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि इतर नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.शेतकरी हा देव असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेला कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवण्याचे सामर्थ्य राखतो. मात्र राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेतेमंडळी आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत अशा शब्दांत शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!