Share

‘शेतकऱ्यांच्या पैशावर मजा मारणारी ही बांडगुळं नष्ट व्हावीत म्हणूनच मोदींच कृषी विधेयक’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. आज शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी होणारी बैठक शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली.

या कृषी विधेयकांवरून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. आता, भाजप नेते अवधूत वाघ यांनी नाशिक येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालावर अधिकचा सेस लावल्याचं सांगत हा प्रकार समोर आणला आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुबाडलं जात असल्याचं सांगत त्यांनी नव्या कृषी कायद्याची गरज सांगितली आहे.

‘नाशिक मधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीने कालपासून शेतकऱ्यांच्या मालावर १% सेस लावला याला शेतकरी/व्यापाऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या पैशावर मजा मारणारी ही बांडगूळ नष्ट व्हावीत म्हणून तर मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कृषी विषयक विधेयक आणले.’ असं ट्विट करत अवधूत वाघ यांनी कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांवर घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!