कोलकाता:- मी राज्यातील 10 कोटी जनतेपैकी साडे नऊ कोटी जनतेसाठी तरी काहीतरी केलं आहे. प्रत्येकाला सरकारी योजनेशी जोडलं. कधी-कधी मला असं वाटतं की, मी या खूर्चीवर बसू नये. कारण मी लोकांना सर्वकाही दिलं. मात्र, लोक समाधानी नाहीत. मी कित्येक वर्षांपासून जे काम केलं ते दुसरं कुणी करुन दाखवलं तर मी राजीनामा देईन, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका सभेत काही लोकांनी प्ले कार्ड दाखवत त्यांच्या विरोधात निदर्शने केली. या घटनेमुळे मंचावर उपस्थित ममता बॅनर्जी प्रचंड भावूक झाल्या. व त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या गोपालनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. गोपालनगरमध्ये त्या मतुआ समजाला संबोधित करत होत्या. मात्र, त्यांच्या भाषणावेळी काही लोकांनी त्यांच्या विरोधात प्ले कार्ड्स दाखवले. त्यामुळे ममता बॅनर्जी भावनिक झाल्या. कधी-कधी मला असं वाटतं की, मी या खूर्चीवर बसू नये. कारण मी लोकांना सर्वकाही दिलं. मात्र, लोक समाधानी नाहीत. मी मेदनीपूर गेली होती. तिथे लोकांनी दोन पिशव्या भरुन चिठ्ठ्या दिल्या. मी जिथे जाते तिथे लोक चिठ्ठ्या देतात, असा खेद ममता यांनी व्यक्त केला.
चार पाच लोकं ज्याप्रकारे प्ले कार्ड्स दाखवून सभा उधळण्याचा प्रयत्न करत आहेत ते योग्य नाही. कुणी काही मागितलं, काही सांगितलं तर सरकार त्यांच्या सर्व गोष्टी ऐकत आहे. त्यानुसार सरकार कामही करत आहे. पण सरकारची देखील क्षमता आहे. सरकारला देखील काही मर्यादा आहेत. आम्ही सर्वांनाच खूश करु शकत नाहीत. मी माझ्या 9 वर्षांच्या कार्यकाळात जे काही केलं ते जर कुणी करुन दाखवलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन”, असं ममता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- ‘शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात’
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- खा. शरद पवारांच्या नावाने महाविकास आघाडी सरकार लागू करणार योजना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

