Share

सकारात्मक राजकारण : राज्याला रेमडेसिविरची 50 हजार इंजेक्शन्स उपलब्ध करुन देणार – भाजपा

Published On: 

मुंबई : देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे.या पार्श्वभूमीवररुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना उपचारासाठी संजीवनी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन तुटवडा राज्यात देखील निर्माण झाला आहे. केद्रांकडून हा पुरवठा योग्य त्या प्रमाणात होत नसल्याची टीका राज्य सरकारमधील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान,आता भाजपकडून सकारात्मक राजकारण केले जाऊ लागले असून राज्यासाठी रेमडेसिविरची इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत.

इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणला भेट दिली आहे. दमणला रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या खाजगी कंपन्यांशी दरेकर यांनी चर्चा केली आहे. भाजपकडून राज्यासाठी 50 हजार रेमडेसिविरची इंजेक्शने उपलब्ध करून देऊ अशी घोषणा दरेकर यांनी केली आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेंकर आणि प्रसाद लाड दमनला गेले होते. यावेळी त्यांनी ब्रूक फार्मा प्रायवेट लिमिटेड कंपनीशी चर्चा केली. अंशू ब्रूक फार्मसीचे मालकाने महाराष्ट्राला लागेल तितकं रेमडेसिवीर देण्याच आश्वासन दिल्यानंतर राज्यासाठी भाजपकडून ५०,००० रेमडेसिवीर इंजेक्शन्सची घोषणा करण्यात आली आहे.

आरोप, प्रत्यारोप खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर ही वेळ आली नसती असे भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले. कोणताही काळाबाजार न होता महाराष्ट्रात रेमडिसिवीरचा वाटप होईल असा विश्वास देखील यावेळी भाजप नेत्यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचा पार्श्वभूमीवर भारत सरकारने हे इंजेक्शन व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर काल बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शन व ते बनवण्यासाठी लागणारी सामग्री देशाबाहेर निर्यात करता येणार नाहीये. हा निर्णय देशातील करोना परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत लागू असेल. यामुळे करोना विषाणूच्या गंभीर रुग्णांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!