Share

मोदींच्या ऑडिओ संदेशात छेडछाड करून बनवली अश्लील व्हिडिओ क्लिप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाबाबतच्या एका संदेशात छेडछाड करून त्याला अश्लील स्वरूपात प्रसारित करण्यात आले होते. मात्र सायबर पोलिसांनी त्वरित तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. शेख अनिस शेख गफार (मुरूमखेडा, ता. बदनापूर) असे आरोपीचे नाव आहे. आजकाल हे असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून अशा गोष्टी प्रसारित केल्या जातात आणि नेटकरी देखील अशा गोष्टींना चांगला प्रतिसाद देतात. मात्र सर्वसामान्य तसेच इतर कोणाच्या भावना दुखावल्या जातील याचे देखील भान ठेवणे गरजेचे आहे.

या प्रकरणाची तक्रार देणारे प्रवीण ज्ञानदेव साबळे यांनी गावकऱ्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य मुरूमखेडा असा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये कोरोनासंदर्भाने एक संदेश टीव्हीवर प्रकाशित केला होता. त्या संदेशामध्ये शेख अनिस शेख गफार याने छेडछाड करून अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली होती. यानंतर ती व्हिडिओ क्लिप सदरील व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली. यावरून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या होत्या. यानंतर प्रवीण साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा सायबर येथे वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. परंतु आरोपी परराज्यात गेला होता. आता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला. गुन्हा केल्याची आरोपीने कबुली दिली. आरोपी ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे ट्रक घेऊन तो नेहमी परराज्यात राहायचा. यामुळे पोलिसांना त्यास अटक करायला अडचणी निर्माण व्हायच्या. दरम्यान, त्यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, एलसीबी पीआय सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मारुती खेडकर, देशमुख, सुधीर गायकवाड, अंबादास साबळे आदींनी पार पाडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!