मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात होता. ऑस्ट्रेलियामध्येच असताना त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली होती. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. बीसीसीआयने सिराजला भारतात परत येण्याचा पर्याय दिला होता. तो ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतण्याचा विचार देखील करत होता.
पण या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयात भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला पाठिंबा दिला, त्याच्याशी संवाद साधला. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात थांबण्याचे बळ मिळाले, असे स्वतः सिराजने एका मुलाखतीत सांगितले.
तू कसोटी सामना खेळ, बघ तुला पाच विकेट काढण्यात यश येईल. तुझ्या वडिलांच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत, असे प्रशिक्षक शास्त्री यांनी सिराजला पदार्पणाच्या सामन्याआधी सांगितले. पदार्पणाच्या सामन्यात दोन डावांत मिळून सिराजला ७७ धावांत ५ विकेट घेण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा शास्त्री यांनी सिराजसोबत संवाद साधला. शास्त्री सर खूप खुश होते. तुला मी सांगितले होते ना की तू पाच विकेट घेशील, असे ते मला म्हणाले. त्यांच्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, असे सिराजने सांगितले. वडिलांच्या निधनानंतर विराटने, प्रशिक्षक शास्त्री सर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण सर यांना मला धीर दिल्याचे सिराज म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेत्री दिशा पटानीने कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट
- ‘परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल’
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- कॅन्सरच्या उपचारानंतर किरण खेर पहिल्यांदा आल्या चाहत्यांसमोर, म्हणाल्या …
- मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

