मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांना लॉकडाऊनमध्ये बाहेर जावे लागले. मंगळवारी दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांना सामोरे जावे लागले. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी वांद्रे येथील जिमनंतर कार ड्राइव्हसाठी बाहेर गेले होते. वांद्रेच्या बॅन्डस्टँडमधील मोहिमेच्या दुसर्या फेरीत त्यांना पोलिसांनी रोखले.
या दरम्यान दिशा पाटनी गाडीच्या पुढच्या सीटवर बसली होती आणि टायगर मागील सीटवर बसला होता. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती. कारवाई झाल्यानंतर दिशा पटानीने पहिल्यांदा एक पोस्ट शेअर केली आहे.
दिशान तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत दिशाने ‘थ्रोबॅक’ हे कॅप्शनही दिले आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्रात असल्याचे दिसत आहे. दिशाने बिकिनी परिधान केली आहे. दिशाच्या या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटो व अनेकांनी लाइक आणि कमेन्ट केल्या आहेत. यामुळे दिशा पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
https://www.instagram.com/p/CPpa473AvHn/?utm_source=ig_embed&ig_rid=e9cac525-3710-40c2-92c1-9c81c3bbb03d
कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती. टायगर आणि दिशाला पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी त्यांच्या विरोधात आयपीएस कलम १८८, कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिशा पटानी सध्या तिच्या ‘राधे द मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाविषयी चर्चेत आहे. सलमान खानबरोबरची तिची केमिस्ट्री आणि चित्रपटातील अभिनेत्रीचा डान्स चाहत्यांना आवडला. चित्रपटाच्या बऱ्याच गाण्यांमध्ये दिशाच्या नृत्य मूव्हज कौतुकास्पद होते. राधेनंतर आता दिशा आता पुढी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तर टायगर श्रॉफचे आगामी चित्रपट हेरोपंती २ , गणपत आणि बाघी ४ आहेत. शेवटच्यावेळी बागी ३ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला. यापूर्वी तो हृतिक रोशन सोबत वॉरमध्ये दिसला होता. हा चित्रपट हिट ठरला होता.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊंनी आग्रह केला, ‘जेवण करून जा!’; फडणवीस म्हणाले, ‘आज नको, पुढच्या वेळी नक्की करेन’
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

