बीड – राज्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलासारखी वाढवलेली पिके या पावसात वाहून गेली आहेत. गेल्यावर्षी देखील अशीच अतिवृष्टी झाली होती त्याची सरकारकडून मदत अजून कित्येकांना मिळाली नसताना आता निसर्गाच्या कोपाचा सामना बळीराजाला करावं लागत आहे. मात्र जगाच्या पोशिंद्यावर आलेले हे संकट राजकीय नेत्यांना मात्र दिसत आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र पक्षाचे कार्यकम धुमधडाक्यात करत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अश्याप्रकारे असंवेदनशील वागण्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
जयंत पाटील मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी परळीमध्ये पाटलांचं फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागताचा कार्यक्रम एवढा मोठा आणि भव्यदिव्य झाला की यावेळी बोलताना माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.दरम्यान, जयंत पाटील यांच्या या बेजबाबदार वागण्यावर स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पुजा मोरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
त्या म्हणाल्या,आमच्या बापाच्या गळ्याभोवती आज फाशीचा दोर असताना नेते मात्र गळ्यात मोठे मोठे हार-तुरे घालून घेण्यात धन्यता मानत आहेत. पण याला जबाबदार नेत्यांपेक्षा नेत्यालाच आपला बाप मानणारी शेतकऱ्यांचीच पोरंच जास्त आहेत याच सर्वात मोठं दुःख आहे. म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो, गुलामी करायचीच असेल तर आपल्या कष्टकरी आणि इमानदार बापाची करा. पुढाऱ्यांची करणार असाल तर येणाऱ्या काळात आपला जन्मदाता बाप डोळ्यासमोर दिसणार नाही आणि आपली माय आयुष्यभर चिमूटभर कुंकवासाठी तरसत राहील.आणि तेव्हा बापाच्या सरणावर रडण्याचा अधिकार देखील आपल्याला नसेल असं मोरे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू


