मुंबई : वेस्ट इंडिजने पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेचा 8 विकेटने पराभव केला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगसाठी उतरलेल्या श्रीलंकेचा 49 ओव्हरमध्ये 232 रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना शाय होपने 110 रनची खेळी केली. होपशिवाय एव्हिन लुईसनेही 65 रनची खेळी केली. पण या मॅचनंतर पोलार्डवर टीका होत आहे. श्रीलंकेचा बॅट्समन दानुष्का गुणतिलकाला आऊट करताना पोलार्डने जी पद्धत वापरली, त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
श्रीलंकेने या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मॅचच्या 22 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर गुणतिलकाने शॉट मारला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेला पाथुम निसंका रन काढण्यासाठी धावला. पण पोलार्डची चपळता बघून दोन्ही बॅट्समन क्रीजमध्ये परत आले. परत येताना गुणतिलकाचा पाय बॉलला लागला आणि बॉल मागे गेला. यावेळी पोलार्ड चिडला आणि त्याने लगेच अंपायरकडे तक्रार केली आणि आऊटसाठी अपील केलं.
https://twitter.com/ArjunNamboo/status/1369677212094373892?s=20
पोलार्डच्या अपीलनंतर अंपायर जोएल विलसन थर्ड अंपायरकडे गेले. रिप्ले बघितल्यानंतर गुणतिलकाला थर्ड अंपायरने आऊट दिलं. ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड केल्याचं सांगत गुणतिलकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?


