नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील लिमटेक येथे बॅनर लावण्याच्या कारणावरून सहा जणांनी गावातील महेश सुरेशराव पाटील (२९) यास बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान १२ ऑगस्ट रोजी पहाटे मृत्यू झाला. उमरी पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
महेश पाटील याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनूसार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मयत महेश हा आपल्या शेताकडून घराकडे मोटरसायकलवरून येत होता. यावेळी गावात आल्यावर आरोपीने बॅनर लावण्याच्या कारणावरून महेश यास जबरीने आपल्या घरात नेऊन पकडून ठेवले. यावेळी इतरांनी त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाने डोक्यात बॅटने मारून महेशला गंभीररित्या जखमी केले. यामुळे महेश हा बेशुद्ध पडला. लगेच त्यास उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे एका खासगी दवाखान्यात दाखल केले.
उपचारादरम्यान १२ ऑगस्ट रोजी पहाटे महेश पाटील याचा मृत्यू झाला. सदर घटनेप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी मयत महेश पाटील यांची आई कलावतीबाई सुरेश पाटील ( ५२ ) यांनी उमरी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून खुशाल मोहनराव पाटील , आदित्य खुशाल पाटील , सुनिता खुशाल पाटील , त्र्यंबक माधवराव पाटील , शैलेश त्र्यंबक पाटील , मारुती उर्फ मनोज अशोक पाटील सर्व राहणार निमटेक अशा सहा जणांविरुद्ध उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.