Share

‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलतना प्रथमच राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर कडक शब्दांत भाष्य केले आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.

तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचादेखील समाचार घेतला. खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिखान केल्यामुळे, कोणताही संदर्भ न देता लिहिल्यामुळे मराठा समाजाची डोकी भडकली असा आरोप ठाकरे यांनी केला.

ते म्हणाले, ‘जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. पाहिलं तर जातीचा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रात झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर, कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे.’

‘मग शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर बोललं मग ते ह्या जातीच्या लोकांनी बोललंय, मग हे बोलले, प्रत्यक्षात काय? पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी साताऱ्यातील जाधव नावाच्या मुलानं फोनवर बोललं की, मोरोपंत पिंगळे या सर्वांनी शिवाजी महाराजांना विष दिलं आणि शिवाजी महाराज ओरडत होते त्यामुळे त्यांनी तोंडावर उशी दाबून ठेवली आणि मारलं.. तर त्या मुलाने विचारले हे संदर्भ तुम्ही कुठून आणलेत. हे कुठून कळलं? यामध्ये शेवट असा आहे की, खेडेकर म्हणाले मला जे वाटल ते मी लिहील मला वाटेल ते मी लिहीन असं त्यांनी म्हटलय.. हे वाचून अनेक मराठ्यांची डोकी भडकली परंतू यांनी असे लिहावं याच्यामागे डिजाईन होते. ज्या महाराष्ट्रानं या देशाला विचार दिला तो महाराष्ट्र जातीपातीमध्ये खितपत ठेवायचा का आपण?’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!