Share

मतदारांच्या नाव नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Published On: 

वर्धा :- जिल्हयात 1 ते 30 नोव्हेबर या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील एकही मतदार मतदानापासुन वंचित राहू नये यासाठी मोठया प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. राजकीय पक्षानी सुध्दा नाव नोंदणीसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत जनजागृती व नाव नोंदणीसाठी राजकीय पक्षांचा सहभाग असावा यासाठी जिल्हाधिका-यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना नाव नोंदणीसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

जिल्हयात येत्या काही काळात जिल्हा परीषद, पंचायत समित्या, नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणूका होणार आहे. या निवडणूकासाठी पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदार यादया वापरण्यात येणार आहे. ही अंतिम मतदार यादी असल्याने नवीन मतदारांनी नावे नोंदवावी, काही कारणास्तव वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावाचा समावेश करण्यात यावा किंवा मतदार यादीत मतदारांना बदल करता यावा यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमा अंतर्गत 1 नोव्हेंबर रोजी एकत्रिकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मतदारांनी यादीत आपल्या नावाचा समावेश असल्याचे खात्री करुन घ्यावे. याबाबत दावे व हरकती असल्यास 1 ते 30 नोव्हेबर या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. बुथ स्तरावर निवडणूक विभागाचे केंद्र स्तरीय अधिकारी कार्यरत असून राजकिय पक्षांनी सुध्दा केद्र स्तरीय प्रतिनिधी नेमूण जास्तीज जास्त मतदारांची नोंदणी करण्याचे सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!