🕒 1 min read
दुबई: ट्वेन्टी-२० विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने सलग तिसरा विजय प्राप्त केला. यासह पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला. मात्र या दरम्यान दोन्ही देशांचे फॅन्स स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर याठिकाणी वाद होण्यास सुरुवात झाली. तर काही फॅन्स तिकीट न घेताच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. आणि यादरम्यानच त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ आता समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.
मॅचचा निकाल जवळ येत असतानाच दोन्ही देशांचे फॅन्स अधिक उत्साहित झाले होते. त्यांनी आपल्या टीमला प्रोत्साहन देताना इतरांशी मारामारी सुरु केली. यानंतर काहीवेळ गोंधळही उडाला. मात्र सुरक्षा रक्षकांनी येथील परिस्थिती नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला.
Afghan crowd is desperate to watch match many are arrested by police they were trying to enter stadium without ticket #afg #pak #PakvsAfg pic.twitter.com/d0bR78vqBA
— Qamber Zaidi (@qamberzaidii) October 29, 2021
दरम्यान पाकिस्तानने मॅच जिंकताच त्यांचा एक फॅन थेट पिचवर दाखल झाला. त्यालाही सुरक्षा रक्षकांकडून पकडण्यात आले. दरम्यान अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान यांनी या मॅचपूर्वी सर्व फॅन्सना शांततेचं आवाहन केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- विंडीजचे आव्हान कायम; बांगलादेशवर रोमहर्षक विजय
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
