नाशिक – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच चिघळत चालला असून सुहास कांदे यांनी आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही त्यांनी तक्रार केली आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील मंजूर कामाच्या निधीचं वाटप होऊ नये अशी मागणी सुध्दा केली आहे.
नादगाव मतदार संघाचे आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवत लेटर बाॅम्ब फोडला आहे. निधी वाटपात दुजाभाव होत असून ही न्यायप्रविष्ठ बाब आहे. बैठकीत निधी वर्ग करण्याचा विषय घेतल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांत तक्रारही दाखल करणार आहे. या लेटर बॉम्बमुळे नियोजन समितीची प्रस्तावित बैठक रखडण्याची शक्यता आहे. या लेटर बॉम्ब प्रकारावर पालकमंत्री भुजबळ व जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहीला नाही. तो राग इतरांनी का मनात ठेवावा. इतरांनी देखील आपल्या मनात राग ठेऊ नये. माझी कुणाविरूद्धही तक्रार नसून माझ्या कडून या वादाला मी पूर्णविराम देऊ इच्छितो आहे, आमचे मुख्य न्यायाधीश हे मुख्यमंत्री असून ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

