Share

रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय षडयंत्र ? ट्रस्टने फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप

Published On: 

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र करण्यात आलेले सर्व आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत फेटाळले आहेत.

‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सर्वप्रथम या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आराेप केला हाेता. व्यवहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या स्टॅंप पेपरच्या वेळांबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. या आरोपांवर ट्रस्टने आपले म्हणणे मांडले असून यात म्हटले आहे की, सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून बाग बिजेरची जमीन खरेदी केली होती. त्यानुसार त्याचा दर दोन कोटी रुपयांत निश्चित करण्यात आला होता व याची नोंददेखील करण्यात आली होती.

ज्यावेळी मंदिराने ही जमीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी पाठक कुटुंबिंयाकडून 18 मार्च 2021 रोजीच्या बाजार भावाने दर निश्चित केले व आजच्या दरानुसार ते मंदिर ट्रस्टला विकले. ट्रस्टने मंदिर विस्ताराची योजना आखली असून यासाठी 108 एकर जमिन लागणार आहे. यापूर्वी मंदिर संकुल 3 एकरात होते ते आता 5 एकरात बांधले जाईल.

मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 70 एकर जमीन खरेदी केली जात आहे. अलीकडेच ट्रस्टने जवळ पासची दोन मंदिरे 4-4 कोटींमध्येही खरेदी केली आहेत. ज्या लोकांकडून या जमिनी घेतल्या जात आहेत, त्या लोकांनाही इतरत्र जागा देण्यात येत आहे. संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय माेक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे. सध्या जे आरोप केले जात आहेत, ते नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी केले जात आहेत. हे पूर्णता राजकीय दृष्टीकोणातून आरोप केले जात असल्याचेही चंपतराय यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!