मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सातत्याने लांबणीवर पडलाय. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचपणी सुरू केलीय. मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू, काही नव्या चेहऱ्यांची वर्णी तर काही मंत्र्यांचं खातेबदल होण्याची शक्यता आहे.
राज्यातून नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत, तर रामदास आठवले, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे तीन राज्यमंत्री आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीमाना दिलेला होता. राज्यातील तीन कॅबिनेट मंत्र्यांकडे एकेका मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे. राज्यातून एका खासदाराची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
बीडच्या खासदार व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, काँग्रेस ते भाजपचे राज्यसभा खासदार असा प्रवास केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
हे देखील उत्सूक
नंदुरबारच्या खासदार व आदिवासी महिला नेत्या हिना गावित आणि सांगलीचे खासदार संजयकाका पाटील हे केंद्रीय मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातून संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे असे दोनच मराठा मंत्री आहेत. मराठा आरक्षणाचा विषय सध्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मराठा की बिगर मराठा खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची लाॅटरी लागते याविषयी मोठी उत्सुकता आहे.
नारायण राणे का?
नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला अमित शहा कोकणात आले होते. राणे यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपाने कोकणात शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याचंही बोललं जातं होतं. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश आहेत. राणे यांचं पक्षातील वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याशिवाय नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय. याच मुद्द्यावरुन राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

