नवी दिल्ली – भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केलं आहे. मुस्लीम समाजातील लोक कोरोना लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच लसीकरणासंदर्भात मुस्लीम समाजामध्ये अनेक गैरसमज असल्याचं देखील रावत यांनी म्हटलं आहे.
त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक सध्या लसीकरणापासून दूर राहत आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत आणि त्यांच्यामध्ये लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत असं रावत यांनी म्हटलं आहे.
रावत यांच्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. काहींच्या मते हे कटू असले तरीही सत्य आहे. नाशिकमधील मालेगावात जेव्हा लसीकरण मोहीम राबविली जात होती तेव्हा तेथील मुस्लीम समाजातील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली होती. ‘लसीचा काहीही फायदा होत नाही. लस घेतल्यावर कोरोना होणार नाही, असे लिहून दिले, तर आम्ही घेऊ,’ असे खडे बोल येथील नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुनावले गेले होते.
फक्त भारतच नव्हे तर पाकिस्तानात देखील हीच समस्या आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत पंजाबला देण्यात आलेलं लक्ष्य पूर्ण करू शकत नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आहे. यानंतर लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तींचं सिमकार्ड ब्लॉक करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानच्या पंजाब सरकारने दिला आहे.
दरम्यान, लसीकरणाच्या बाबतीत अनेक गैरसमज देखील पसरले होते त्यात काही महाभागांनी कोव्हिड लशीमध्ये डुकराचं मांस मिसळलं असल्यामुळे मुसलमानांनी लस घेऊ नये असं सांगितलं होतं. मात्र भारतातील दोन्ही लशींमध्ये डुकरांचं मांस मिसळलेलं नाही, हे सत्य आहे. हे असे प्रकार घडत असताना बुलढाणा आणि नागपुरातील मौलवींनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. देखील विसरून चालणार नाही. केवळ मुस्लीम नव्हे तर सर्व धर्मातील लोकं विविध कारणे पुढे करून लस घेण्यास टाळाटाळ करतात हे देखील सत्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

